शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

त्रिपक्षीय करार झाल्याशिवाय धुराडी पेटू देणार नाही : मजुरी ३७८ रुपये करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 17:00 IST

ऊस तोडणी मजूरांच्या मजुरी वाढीसह वाहतूक दरात वाढ करण्याबाबतचा त्रिपक्षीय करार होणार नाही, तोपर्यंत साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा ऊस तोडणी मजूर व वाहतूकदारांनी दिला.

ठळक मुद्देऊस तोडणी मजूरांचा इशारा कारखान्यांची धुराडी पेटू देणार नसल्याचे जाधव यांनी सांगितले.

कोल्हापूर : ऊस तोडणी मजूरांच्या मजुरी वाढीसह वाहतूक दरात वाढ करण्याबाबतचा त्रिपक्षीय करार होणार नाही, तोपर्यंत साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा ऊस तोडणी मजूर व वाहतूकदारांनी दिला.

ऊस तोडणी मजूरांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकातून निघालेला मोर्चा दुपारी एक वाजता सहसंचालक कार्यालयावर धडकला. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रभारी प्रादेशिक उपसंचालक डी. एस. खांडेकर यांना देण्यात आले.

यावेळी महाराष्ट ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव म्हणाले, ऊस तोडणी व वाहतूकदारांच्या दरात वाढ करण्याची मागणी गेले वर्षभर आम्ही करत आहे. ऊस तोडणी यंत्राला टनाला चारशे रुपये दिले जाते आणि मजूराला २२८ रुपये हा कोणता न्याय, ही मजुरी किमान ३७८ रुपये करावी, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.

याबाबत २२ सप्टेंबरला राज्य साखर संघाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली, ते सकारात्मक आहेत. पुढच्या बैठकीची वाट न पाहता मजुरीत वाढ केली पाहिजे. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ऊस वाहतूक परवडत नाही; त्यामुळे किमान ५० टक्के वाहतूक दरात वाढ करावी. स्थानिक ४० हजार, तर परजिल्ह्यातील ६० हजार, असे एक लाख ऊस तोडणी मजूर कोल्हापूर जिल्ह्यात असल्याचे जाधव यांनी सांगितले.

तोडणी व वाहतूक दरात वाढ झाल्याशिवाय विळा अथवा कोयत्याला हात घालायचा नाही. त्रिपक्षीय करार तोही तीन वर्षांचा केला पाहिजे, त्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नसल्याचे जाधव यांनी सांगितले. यावेळी प्रा. आबासाहेब चौगले, विलास दिंडे, दिनकर आदमापुरे, आनंदा डाफळे, बाबासो कुरुंदवाडे, आदी उपस्थित होते.गुरुवारी कारखान्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठकऊस तोडणी व वाहतूक दरवाढीबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांसमवेत गुरुवारी (दि. ४) दुपारी तीन वाजता साखर सहसंचालक कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. सांगली जिल्ह्यातील कारखान्यांसमवेत शुक्रवारी (दि. ५) बैठक आहे.या आहेत मागण्या :ऊस तोडणीच्या दरात ४०, तर वाहतुकीच्या दरात ५0 टक्के वाढ करा.मुकादमाचे कमिशन दर २० टक्के करा.माथाडी बोर्डात तातडीने नोंदणी करा.मजूर व बैलजोडीचा विमा लागू करा. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर